Annasaheb Patil Loan Scheme नमस्कार मित्रांनो या लेखात आपण पाहणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे अण्णासाहेब पाटील योजनेला ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या योजनेचा व्यवसायामध्ये कशा पद्धतीने लाभ घेऊ शकता मित्रांनो अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत मराठा समाजातील तरुण उद्योजकांसाठी वीस लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येते. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्जदारांना देण्यात आलेले कर्ज हे बिनव्याजी असते कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही म्हणून जास्तीत जास्त युवा उद्योजक घडवण्याचा प्रयत्न ही संस्था करते नवीन स्टार्टअप करण्यासाठी खूप जण इच्छुक असतात त्यासाठी हा खूप लाभदायक पर्याय आहे.
अण्णासाहेब कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ही योजना महाराष्ट्र राज्यातील युवकांसाठी आहे ही योजना उद्योग व्यवसायासाठी इच्छुक नागरिकांना कर्ज देते महाराष्ट्र राज्यामधील आर्थिक रित्या दुर्बल घटकांचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे
त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजातील युवकांना काम मिळावे आणि त्यांनी व्यवसायाकडे वळावे यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेमुळे राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या सरळ पद्धतीने व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात येते या योजनेअंतर्गत कर्जाचे व्याज महामंडळातर्फे भरले जाते त्यामुळे ही योजना लाभदायक आहे यामध्ये एकूण तीन योजना आहेत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना गट प्रकल्प योजना
यावर क्लिक करून अर्जाची माहिती पहा
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी खालील प्रमाणे पात्रता पाहिजे रहिवाशी हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण ते 45 वर्षाच्या आत मध्ये पाहिजे कौटुंबिक उत्पादन 55 हजार रुपये शहरासाठी आणि चाळीस हजार रुपये ग्रामीण भागासाठी असावे गाव शहरातील वास्तव्य कमीत कमी तीन वर्षाची असावे आणि याचे अर्ज जवळच्या नेट कॅफेवर किंवा ऑनलाईन वेबसाईटवर भरता येतात.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रांमध्ये आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र रहिवासी दाखला जन्म दाखला शाळा सोडल्याचा टीसी उत्पन्नाचा दाखला कर्ज घेण्याचा प्रकल्प अहवाल प्रतिज्ञापत्र आणि कास्ट सर्टिफिकेट पाहिजे
यामध्ये अटी व शर्ती आहेत अर्जदाराला अन्न साहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार यापूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभार्थी नसावा अर्जदाराचे वय 18 ते 50 वयोगटातील असणे आवश्यक आहे, अण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी पुरुष तसेच महिला ही पात्र आहेत तरी त्यांचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त वय 50 महिलांसाठी 55 वर्षे आहे.
या प्रकारची वयोमर्यादा अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेला आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पात्र अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या कमी असावे अर्जदारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत त्या अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येते.
कर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसाय उद्योगाचा फोटो वेबसाईटवर आपण करावा लागतो या प्रकारे तुम्ही ही अस प्रक्रिया संपूर्ण पार करू शकता.